जन्म देवा...
टांगला जेव्हा वडाला जन्म देवा...
आत्महत्येला मिळाला जन्म देवा...
मी कसे उत्तर तुझ्या प्रश्नास देऊ...
सांग कोणाला कळाला जन्म देवा...?
मुर्त झाली पेटण्याने आग किंतू...
काय आगीने जळाला जन्म देवा...?
राख प्रेताची नको तू सावटू रे...
दे मिळू दे हा धुळीला जन्म देवा...
जर भविष्याची जरा चाहूल असती...
तर दिला नसता मुलाला जन्म देवा...
राहिल्या इच्छा अधूर्या खूप देवा...
दे म्हणोनी कावळ्याला जन्म देवा...
-अमित वाघ
८४२१११३३००: ९८२२२६५५७७.
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शुक्र, 20/05/2011 - 22:54
Permalink
जर भविष्याची जरा चाहूल
जर भविष्याची जरा चाहूल असती...
तर दिला नसता मुलाला जन्म देवा...
उत्तम शेर आहे.
एकंदर गझल ठीक. ("धुळीला" हा काफिया चुकलेला आहे. )
पुलेशु.
बेफिकीर
सोम, 23/05/2011 - 23:40
Permalink
टांगला जेव्हा वडाला जन्म
टांगला जेव्हा वडाला जन्म देवा...
आत्महत्येला मिळाला जन्म देवा...
जर भविष्याची जरा चाहूल असती...
तर दिला नसता मुलाला जन्म देवा...>>>
वा वा! मस्तच! (ज्ञानेश्शी सहमत, धुळीला बाबत)
विजय दि. पाटील
मंगळ, 24/05/2011 - 16:41
Permalink
जर भविष्याची जरा चाहूल
जर भविष्याची जरा चाहूल असती...
तर दिला नसता मुलाला जन्म देवा...>>>
मस्त शेर, आवडला!!