गर्भार...

संयमाचे लाड केले फार त्यांनी...
अन् फुलांशी टाळला शृंगार त्यांनी...

जे प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...

काळजी आता भविष्याची कशाला...
वर्तमानालाच केले ठार त्यांनी...

प्रश्न जेव्हा खानदानाचा निघाला...
काढली तेव्हा जुनी तलवार त्यांनी...

पाहिजे त्यांना ऋतू ताज्या हवेचा...
ठेवल्या दाही दिशा गर्भार त्यांनी...

- प्रा. रुपेश देशमुख.

गझल: 

प्रतिसाद

रुपेशराव,
खूप छान.
संयमाचे लाड...ही कल्पना चिंतनीय. वर्तमानाच्या शेरातील थेटपणा भिडला. जुन्या तलवारीचा खोचकपणाही उत्तम.

वाह , क्या बात है रुपेश सहि १नं.
मस्त!!! रुपेश स्टाईल ची गझल.....

प्रश्न जेव्हा खानदानाचा निघाला...
काढली तेव्हा जुनी तलवार त्यांनी...

वा वा, सुरेख

संयमाचे लाड केले फार त्यांनी...
अन् फुलांशी टाळला शृंगार त्यांनी...

जे प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...

प्रश्न जेव्हा खानदानाचा निघाला...
काढली तेव्हा जुनी तलवार त्यांनी...

पाहिजे त्यांना ऋतू ताज्या हवेचा...
ठेवल्या दाही दिशा गर्भार त्यांनी..

वा वा वा! मस्तच!

संयमाचे लाड केले फार त्यांनी...
अन् फुलांशी टाळला शृंगार त्यांनी.. सुन्दर

धन्यवाद...
सगळ्यांनाच...

जबरदस्त गझल. शुभेच्छा.