धमन्यांत वाहते रक्त..

धमन्यांत वाहते रक्त होऊनी पाणी..
अन् थिजलेली.. थकलेली माझी वाणी..!

मी तिथेच आहे, तेंव्हा जेथे होतो..
ही तुझीच झाली प्रगती केविलवाणी..!!

का थांबलीस तू तेंव्हा जाता जाता?
परतून येत मी असता, गेलीस आणि..?

भांबावुन मीही गेलो होतो तेंव्हा..
रडलीस तूच पण, डोळा आले पाणी..

का ऋतू सरावा असला बिन् "बहराचा?"
ह्या वर्षी ही का हेच पुराला पाणी???

-- बहर..

गझल: 

प्रतिसाद

धमन्यांत वाहते रक्त होऊनी पाणी..
अन् थिजलेली.. थकलेली माझी वाणी..! ..... मतला मस्त है बाबुमोशाय

भांबावुन मीही गेलो होतो तेंव्हा..
रडलीस तूच पण, डोळा आले पाणी.. ..... ओह

का ऋतू सरावा असला बिन् "बहराचा?"
ह्या वर्षी ही का हेच पुराला पाणी??? ..... क्या बात है बहोत सुंदर, छेडलीस तार काळजाची...

आणि..
छान आहे हा बहर

मी तिथेच आहे, तेंव्हा जेथे होतो..
ही तुझीच झाली प्रगती केविलवाणी..!!

वा..

वाह!!
पहिले तीन सुंदर!! :)

धन्यवाद चित्तरंजन, आनंदयात्री, हडके साहेब.

आवडली...

मक्ता कळला नाही...आधीच्या शेराचा संदर्भ असेल तर कमकुवत म्हणावा लागेल.

मी तिथेच आहे, तेंव्हा जेथे होतो..
ही तुझीच झाली प्रगती केविलवाणी>>>

जबरी शेर!

धन्यवाद बेफिकीर..