तुझे हेच डोळे...

तुझे हेच डोळे, मला पाहताना, किती मोरपंखी, निळेशार होते,
कळ्या-पाकळ्यांचे, तुझ्या पापण्यांचे, किती जीवघेणे, तरी वार होते !

नभाच्या उराशी, निळ्या ओट्-पोटी , भिनू जात होता, जसा सांजवारा,
तसे विरघळोनि, तुझ्या ह्या भिवांशी, मला भेटले, चांदणे चार होते !

निळे-जांभळे, आरसे अम्बराचे, तुझे रूप आता, मला भेट देती,
हळू चुम्बताना, तुला मौन माझे, किती पांढरे, शुभ्र आकार होते !

नव्या पैजणान्शी, तुझ्या खेळताना, मला नाद छन-छन किती घुंगरांचा,
जिथे ओठ माझे, तुझे भेटले ते, तुझे राजवर्खी अलंकार होते !

किती बोललो मी, तुझ्याशी तरीही, अता शब्द देती न वाचा नव्याने,
तुझे बोलके मौन, सार्या क्षणांचे, दिसांचे, खरे शेंदरी सार होते !

गझल: 

प्रतिसाद

छान... पुढील लेखनास शुभेछा...

किती बोललो मी, तुझ्याशी तरीही, अता शब्द देती न वाचा नव्याने,
तुझे बोलके मौन, सार्या क्षणांचे, दिसांचे, खरे शेंदरी सार होते>> वा वा!

प्रभावी समारोप झाल्यासारखे 'वाटले' नाही. विरामचिन्हे फारच झाली.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

लय मस्त आहे!!

@Befikeer-Aapan mhanalaat tey agdi kharay, viraamchinhe jaasta ahet, pan ti mi muddam taakli ahet, so that kavitecha meter kasa ahe hey vaachakanna kalaava mhanoon...khara pahayla gelyaas baryaachshya viraamchinhaanchi garaj nahiye :-)) sorry mi pahilyandach kavita ithe share keli ani mala andaaj navhta mhanoon commas taakle...

वृत्त छान निभावले आहे राजदीप.पहिल्याच फटक्यात सुमंदारमाला पाहून्,तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पुढील गझलांच्या प्रतीक्षेत.

छान गझल.
वृत्त-हाताळणी उल्लेखनीय आहेच. जास्तीची विरामचिन्हे अनावश्यक.
आणखी खोलात जा. :)

पुलेशु.