एखादा तरी...

आज श्वासांनो भरा हुंकार एखादा तरी
चेतवा राखेतुनी अंगार एखादा तरी

कोठवर टिकणार कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी

साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे
दे जगायाला मला आधार एखादा तरी

जीवनी झाले किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शु दे गंधार एखादा तरी

रिक्त हाताने कसा परतू तुला भेटून मी
काळजावरती हवा ना वार एखादा तरी

चालली आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा तरी

आस ही ठेऊन हल्ली दैव गझला वाचते
शब्द माझा यायचा लाचार एखादा तरी

-- अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी..
वाह!

रिक्त हाताने कसा परतू तुला भेटून मी
काळजावरती हवा ना वार एखादा तरी
वावाह!!!

साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे
दे जगायाला मला आधार एखादा तरी
क्या बात है!!!

हे फार आवडले! :)

रिक्त हाताने कसा परतू तुला भेटून मी
काळजावरती हवा ना वार एखादा तरी

क्या बात..!!

कोठवर टिकणार कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी

चालली आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा तरी

आस ही ठेऊन हल्ली दैव गझला वाचते
शब्द माझा यायचा लाचार एखादा तरी

छान गझल...
वरील शेर खुप आवडले...
वादळी तर एकदम मस्त....
अभिप्राय कमी मिळाल्याचे नवल वाटते....

साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे
दे जगायाला मला आधार एखादा तरी

भन्नाट रे !!!

सुंदर गझल!

अभिनंदन!

छान.. आवडली. :) शुभेच्छा.