निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे

तुझ्या लक्षात ना आले जिथे संकेत येण्याचे
पुरावे कोणते मीही तुला द्यावेत येण्याचे?

सदा डोक्यात करता घोळका नाना विचारांनो
जराही भान नाही का तुम्हा रांगेत येण्याचे?

तुला कारण नसावे एकही टाळायला भेटी
निमित्ते लाख माझी रद्द होण्या बेत येण्याचे

मला माझा बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे

तुला जमणार नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके दुनियेत येण्याचे?
----------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'

गझल: 

प्रतिसाद

सदा डोक्यात करता घोळका नाना विचारांनो
जराही भान नाही का तुम्हा रांगेत येण्याचे? .......... क्या ब्बात है वाह

तुला जमणार नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके दुनियेत येण्याचे? ......... मक्ता भारी है कणखरजी... सहीच.

सदा डोक्यात घोळ नाना विचारांनो
जराही भान् नाही का तुम्हा रांगेत येण्याचे...........Best

कल्पना सुरेख,.........आवडली.

मस्त.

तुला जमणार नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके दुनियेत येण्याचे?

मस्त..बहारदार

सर्वांचे मनापासून आभार!!

मला माझा बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे
>>>

फार फार आवडला हा शेर विजयराव!