''जमले''

काय झाले जर तुला मुखडे बदलणे जमले?
हो ! मला सुद्धा तुझ्या साच्यात बसणे जमले

पाहुनी धाग्यास जळताना प्रकाशासाठी
मेणही गेले शिकुन,.... त्याला वितळणे जमले

वावटळ वेडी जराशी काय ती भेटावी,
मस्तकापर्यंत मातिस आज उडणे जमले

बालपण्,ज्वानी,खुणा वृद्धापकाळा मधल्या
उमर ही नटली,तिला कपडे बदलणे जमले

मानतो आभार मी वाटेतल्या काट्यांचे
त्यामुळे तर ताठ '' कैलासा''स झुकणे जमले.

--डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

काय झाले जर तुला मुखडे बदलणे जमले?
हो ! मला सुद्धा तुझ्या साच्यात बसणे जमले

पाहुनी धाग्यास जळताना प्रकाशासाठी
मेणही गेले शिकुन,.... त्याला वितळणे जमले

मानतो आभार मी वाटेतल्या काट्यांचे
त्यामुळे तर ताठ '' कैलासा''स झुकणे जमले>>

छान!

'जमले' म्हणायला जो पॉज घ्यावा लागत आहे त्यावर आपण बोललोच होतो. मेणाचा शेर आवडलाच!

धन्यवाद!

सर्वच शेर छान 'जमले'त.

मेणही गेले शिकुन,.... त्याला वितळणे जमले....

मस्त!!

आवडली!!