रुढी परंपरेचा का बांधलास शेला?

रुढी परंपरेचा का बांधलास शेला?
या मानवी जगाच्या टाळून सभ्यतेला

येथील संस्क्रुतीला मी हा सवाल केला
वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला?

काबा नको न काशी बस हाक द्या स्वत:ला
अन जागवा जरासे अपुल्याच अस्मितेला

सूर्यास जाग यावी गावाकुसात अमुच्या
येथे युगायुगाचा अंधार दाटलेला

ज्यांना हवाच होता काळोख भोवताली
देतील दोष ते मग या तांबड्या दिशेला

मी मिळविले कितीदा हातात हात ज्यांच्या
सोडून हात माझा जो तो निघून गेला

बोलू कसा कुणाशी? मज प्रश्न ग्रासतो हा
एकेक शब्द माझा कंठात दाटलेला

दिसती कसे मला हे सारेच शांत येथे
माणूस शोधतो मी आतून पेटलेला

गझल: 

प्रतिसाद

सभ्यतेला,भुकेला, दाटलेला, दिशेला, पेटलेला

आवडलेत.

वाह विद्यानंद.... मझा आगया. क्या बात है.

भन्नाट!!!!!

'गावाकुसात '.. हा शब्द गावकुसात असाच हवा...ऐवजी..

सूर्यास जाग यावी गावात आज अमुच्या....असे काहीसे करता येईल.

बकि सुरेख!

येथील संस्क्रुतीला मी हा सवाल केला
वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला?

वा!

धन्यवाद,
गंगाधरजी,
बहर,
शाम,
क्रांतीजी

मस्त गझल आवदलि

अप्रतिम!

मतला, भुकेला,दिशेला,पेट्लेला,दाट्लेला,
वरील सर्वच शेर छान्,झकास, खूप आवड्ले.

धन्यवाद मित्रांनो...