'आहे 'खरेच का मी ..(एक नवीन शेर)

'आहे 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले


होतो जिवंत तेव्हा, साधे न बोलणारे
पश्चात भाषणेही ठोकावयास आले


संभावितांपुढे मी वाचू कशास गीता...
साधेच लोक गझला वाचावयास आले


शेजारखेळ त्यांनी केला असा इमानी..!
लावून आग, पाणी टाकावयास आले


भाषा मराठमोळी, आहे म्हणून माझी
शब्दांपुढ्यात माझ्या वाकावयास आले

दु:खात सांत्वनाला आले असे, जणू ते..
फु़कटात दु:ख माझे झोकावयास आले..!


                                         -संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल: 

प्रतिसाद

संतोष,
आपली गझल वाचून भट सरांची  एक गझल आठवली. त्यात ही अशीच एक ओळ आहे...
खातरी न झाली त्यांची ते आत डोकावले...
आत सगळे शेर आठावत नाही. कुणाला आठवत असेल तर पोस्ट करावी...

दु:खात सांत्वनाला आले असे, जणू ते..
फु़कटात दु:ख माझे झोकावयास आले..!
मक्ता फार आवडला.

दु:खात सांत्वनाला आले असे, जणू ते..
फु़कटात दु:ख माझे झोकावयास आले..!
वा! वा! क्या बात है!

मनापासून दिलेल्या दादेला मनापासून धन्यवाद.

दु:खात सांत्वनाला आले असे, जणू ते..
फु़कटात दु:ख माझे झोकावयास आले..!
खरे आहे. भावल्या ह्या ओळी.