आरंभ...

आरंभ...

हे सूर छेडताना, भलताच त्रास झाला...
माझ्या गळ्यास माझा, आवाज फास झाला...

स्मरूनी तुला सख्या रे, मल्हार छेडला मी...
संचीत आठवांचा पाऊस खास झाला...

विरहातही तुझ्या या, मी सार्वभौम होते...
'ती' एक वीज आली, संपूर्ण र्‍हास झाला...

मी पोचता समेवर, गोठून काळ गेला...
आकांत मारव्याचा, आजन्म दास झाला...

मी भैरवीस जेव्हा, माळावया निघाले...
दुर्दम्य वेदनेने, समृद्ध श्वास झाला...

मैफील संपल्याने झाली जरी निराशा...
अंतामुळेच माझा, 'आरंभ' ध्यास झाला...

- निरज कुलकर्णी.

गझल: 

प्रतिसाद

आवडली गझल..!

अतिशय सुरेख!

एक एक शेर सव्वाशेर !!!

खूप सुंदर!
समृद्ध श्वास झाला...
ही ओळ थोडी विसंगत('समृध्द'मुळे)वाटली
विश्लेषण केल्यास बरे होईल!
रामकुमार

सुरेख गझल.