अस्ता॑चली रवी

अस्ता॑चली रवी मी विझता॑ना पहात होतो ।
पाऊल खुणा माझ्या मिटता॑ना पहात होतो ॥१॥

तो गाज सागराचा ऐटी ऽ त लाट होती ।
लाटेस किनार्‍यासी विरता॑ना पहात होतो ॥२॥

मोहात मी कितिकदा फसलो नि बुडलो होतो ।
लाटा॑त किनार्‍याला बुडता॑ना पहात होतो ॥३॥

या अथा॑ग सागराचा तो अल्पसा किनारा ।
मिलनाचे निकष सारे तुटता॑ना पहात होतो ॥४॥

अमर्याद साठे कोठे इतरा॑ना थे॑ब ही ना ।
व्याकुळ जीव जना॑चे जगता॑ना पहात होतो ॥५॥

होडीत सागराची आणून नित्य दौलत ।
कोणा॑स सागराला लुटता॑ना पहात होतो ॥६॥

जलदा॑परी मी व्हावे जीवन जना॑स द्यावे ।
मी ढगा॑स सागराला लुटता॑ना पहात होतो ॥७॥

गझल: 

प्रतिसाद

रचना ओळीत म्हणताना खटकते आहे. वृत्त नीट तपासून बघावे.