कर प्रीये हॄदयाचे हाल पुन्हा एकदा

घाव तुझ्या नजरांनी घाल पुन्हा एकदा
कर प्रीये हॄदयाचे हाल पुन्हा एकदा

मनं माझं आता; माझे ऐकू लागले
नयनांनी मोहिनी घाल पुन्हा एकदा

जीव घेणं माझा आवडतनां तूला
निघालो जगावया मार पुन्हा एकदा

'मी तुझीच प्रिया' बोलली तू कितीदा
ओठांना हाय तरी टाळ पुन्हा एकदा

घट्ट मिठी मारुनी 'जीवलगा' म्हणाया
त्या मंदिरात पडक्या चाल पुन्हा एकदा

गझल: