ती बातमीच दाटली घशाशी

ती बातमीच दाटली घशाशी
गर्दीच कोण साठली घराशी!

नाही मला अता जगावयाचे
भांडेच आज सावली जगाशी

का ढवळता निवांत त्या तवंगा
ईच्छा तळात नाचली मघाशी

गेले गळून आप्त पान कसे?
फांदी मनात हालली जराशी

जे बोललो मलाच लागले ते
ती जीभ मीच चावली अधाशी

गझल: