'आहॅ 'खरेच का मी ...

'आहॅ 'खरेच का मी ..जोखावयास आले
निश्वास एकदाचा टाकावयास आले

होतो जिवंत तेव्हा, साधे न बोलणारे
पश्चात भाषणेही ठोकावयास आले

संभावितांपुढे मी वाचू कशास गीता...
साधेच लोक गझला वाचावयास आले

शेजारखेळ त्यांनी केला असा इमानी..!
लावून आग, पाणी टाकावयास आले

भाषा मराठमोळी, आहे म्हणून माझी
शब्दांपुढ्यात माझ्या वाकावयास आले

                                         -संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: