वळता वळता

टाळलेस तू मागे बघणे वळता वळता
ती नजरेची भेट राहिली घडता घडता

या मातीचा लळा असावा सूर्यालाही
हिरमुसला तो उदासवाणा ढळता ढळता

वेड विलक्षण बघ रात्रीचे काजव्यासही
नदीकिनारी सखी शोधतो जळता जळता

हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना
दिसली त्याला प्रिया असावी पळता पळता

या प्रेमाच्या अन प्रीतीच्या अनंत व्याख्या
कळेल तुजला प्रेम काय ते कळता कळता

गझल: 

प्रतिसाद

हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना
दिसली त्याला प्रिया असावी पळता पळता
विरेन्द्र्जी ,गझल खूप आवडली .आणि हा शेर तर कळसच.

वाहवा!

छान आहे गझल....