व्यर्थ जगणे !
व्यर्थ जगणे !
व्यर्थ जगणे!... जोडण्याला पुण्य काही, पाप काही !
श्राध्द माझे घातले मी ठेवला ना व्याप काही !!
कोण माझे, कोण वैरी जाणते ना कैकवेळा....
केवड्याच्या सोबतीला भृंग काही साप काही !!
'कर्म केले... सोडले ते ’, ज्ञात गीता सार सा-या,
गोड मी मानून घेते पूर्वजांचे शाप काही !!
काय देवू जाब त्याचे, जे न मी केलेत गुन्हे,
ऐनवेळी ठोकते मग आठवे ती थाप काही !!
भोगलेले मांडते रक्ताळलेल्या लेखणीने....
सांडले भाळावरी जे प्राक्तनाचे माप काही !!
ये असा मरणा समोरी, मानली मी हार नाही,
उंबरा ओलांडण्याची ना सुखाची टाप काही !!
मी उरावे ना उरावे, शब्द व्हावे अमृताचे
गौणतेला अर्थ यावा, ध्यास ना अदयाप काही !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
कमलाकर देसले
शनि, 15/01/2011 - 16:04
Permalink
सुप्रीयाजी ,क्या बात है !गझल
सुप्रीयाजी ,क्या बात है !गझल खूप आवडली
राकेशविखार
शनि, 15/01/2011 - 20:56
Permalink
'कर्म केले... सोडले ते ’,
'कर्म केले... सोडले ते ’, ज्ञात गीता सार सा-या,
गोड मी मानून घेते पूर्वजांचे शाप काही !!
वाह!!! फारच छान!
supriya.jadhav7
रवि, 16/01/2011 - 21:19
Permalink
कमलाकरजी... राकेशजी... आपल्या
कमलाकरजी...
राकेशजी...
आपल्या मौलिक प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार !
-सुप्रिया.