नाव तुझ्या ओठावर...

नाव तुझ्या ओठावर माझे
धरती माझी अंबर माझे

स्पर्शामधला प्रश्न तुझा अन
मौनामधले उत्तर माझे

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे

मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे

हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

अख्खी गझल उत्तम झाली आहे. सगळेच शेर आवडले.

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे

वाव्वा..

हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे
क्या बात है....

वा वा! मस्तच गझल आहे.

सुरेख!

फार छान.....

मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे

हा शेर फार आवडला. :)

मस्तच
सगळेच शेर आवडले.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

.वैभवजी ,कसली भन्नाट गझल लिहिली राजे तुम्ही.क्या बात है !खुपदा वाचली .आशयाची तरलता भावस्पर्शी आहे .खूप आवडली

क्लास

क्लास

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे

हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे
क्या बात है....

अख्खी गझल उत्तम

वैभवजी! सुंदर गझल आहे! तरल आहे. कुठलाही बदल आवश्यक नाही.फक्त शेवटच्या शेरावर अजून चिंतन व्हावे, असे वाटून गेले.

केवळ आपल्या आस्वदासाठी, आपले काफिये व रदीफ मी असे चालवून पाहिले.
पहा कसे वाटतात आमचे खयाल! कृपया आपली प्रांजळ मते कळवावीत. वाचायला आवडतील.................
टीप: कुठल्याही तुलनेचा हेतू नाही. कृपया गैरसमज नसावा.

नाव तुझ्या ओठावर माझे!
तुझ्या धरेवर अंबर माझे!

नजरेमधला प्रश्न तुझा अन्;
मौनामधले उत्तर माझे!

तुझ्याच स्मरणांमधे राहतो!
स्मरण तुझे झाले घर माझे!!

तुझ्यात माझा गंध मिसळला!
तुझी कुपी पण अत्तर माझे!!

तुझ्या मनाच्या अंगणामधे........
बहरावे गुलमोहर माझे!

...........प्रा.सतीश देवपूरकर
..........................................................................................................

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझ.. व्वा व्वा

स्पर्शामधला प्रश्न तुझा अन
मौनामधले उत्तर माझे

मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे

क्या बात है!
अप्रतीम.