राखते तोल मी.....!!!
राखते तोल मी.....!!!
जे पाहते - जाणते ते बोलते बोल मी,
गुंत्यात का भावनेच्या गुंतते खोल मी ?
कोणी - कसेही - कुठेही बोलते - वागते,
माझ्याच ना आसवांचे जाणते मोल मी !
तालावरी ढोलकीच्या नाचली पैंजणे ,
वॄंदावनी मंजि-यात्या वाटते फ़ोल मी !
गंधाळुनी रात हिंदोळी सुखाच्या झुले ,
मीठीतही साजणाच्या राखते तोल मी !
साराच हा खेळ मिथ्थ्या , येर-झा-या ठरे
पृथ्वीपरी भोवताली का फ़िरे गोल मी ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
कमलाकर देसले
रवि, 16/01/2011 - 23:17
Permalink
गंधाळुनी रात हिंदोळी सुखाच्या
गंधाळुनी रात हिंदोळी सुखाच्या झुले ,
मीठीतही साजणाच्या राखते तोल मी
सुप्रीयाजी ,ह्या द्विपदी मागील स्त्रीविषयक चिंतन विलक्षण .गझल बेहद आवडली .