''वेदना''

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे

राखतो या चेहर्‍याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहताहे आसवांचा पूर आहे

काय लावू चाल मी या जीवनाला
जीवनाचे गीत तर बेसूर आहे

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

-डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

मतला छान!!!!

वाहताहे आसवांचा पूर आहे....एकाच ओळीत 'आहे' २ वेळा चुकून/अनावधानाने आलेलं दिसतंय.

बाकी शेर सुंदर.

मक्त्यातील सानी मिसरा अजून सुरेख होऊ शकला असता.

हो शाम.... वाहतो हा आसवांचा पूर आहे असं अभिप्रेत आहे. :)