मी विस्कटल्या खोलीत मनाच्या..

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..
पडतात कवडसे..त्यांना पाहुन हसतो..

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो..

देतात दिलासे ऋतुही जाता जाता..
मी आता केवळ त्यांना पाहुन हसतो..

गर्दीत मिसळतो..गर्दी होऊन जातो..
चालतो..हासतो..जातो..येतो..बसतो..

तू वचने दे..आश्वासन.. आणा-भाका..
मी निमुटपणाने त्याच्यावर विश्वसतो..

शिषिरागम आहे 'बहर' कोठुनी यावा?
स्वप्नांची पाने गळती..वेचीत बसतो..

गझल: 

प्रतिसाद

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..
पडतात कवडसे..त्यांना पाहुन हसतो..

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो..

वावा!

धन्यवाद चित्तरंजन..

मलाही तेच दोन आवडले..
मस्त!! :)

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..
पडतात कवडसे..त्यांना पाहुन हसतो..

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो.

फार छान. :)

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो..

वा. मस्त!

मक्ता !!!!!...:)

खूप आवडला

मतला, दुसरा आणि मक्ता खूप आवडले

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.

सर्व गझल आवडली. अभिनंदन! मस्तच गझल आहे.

धन्यवाद!