पुन्हा पुन्हा !!
तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा पुन्हा पुन्हा !
तुझ्या स्म्रृतीत चांदवा जळेल हा पुन्हा पुन्हा !!
उनाडतो, पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा पुन्हा पुन्हा !!
न सावरुन आवरे, ग स्वार हा हवेवरी,
तुझ्या समीप राहण्या, ढळेल हा पुन्हा पुन्हा !!
तुझाच गंध माळुनी ग मत्त होय केवडा ,
तुलाच फ़क्त भ्रुंग जोखळेल हा पुन्हा पुन्हा !!
तुझी अदा चढे नशा, नसा-नसा सळाळती,
ग मीच का? व्रतस्थ ही, चळेल हा पुन्हा पुन्हा !!
तुझीच रुप-पल्लवी खुणावते अता मला,
विणातुझ्याच जन्म का घळेल हा पुन्हा पुन्हा !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल: