अबोली !!!
अबोली !!!
.
*
अजस्त्र ज्वाला लपापणा-या कणात माझ्या!
सहस्त्र लाटा उधाणती का मनात माझ्या?
*
मनाप्रमाणे निकाल लावू भल्याभल्यांचा,
मनुष्य कोठे.....? कुबेर मिंधा धनात माझ्या!
*
जगोत किंवा मरोत कोणी तमा कुणाला?
लखाखणारा सुराच आता ऋणात माझ्या!
*
घरी नि दारी सदैव नांदी नराधमांची,
मिळे उपेक्षा पदोपदी ’या’ जनात माझ्या!
*
सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
मनिषा नाईक.
बुध, 17/11/2010 - 13:56
Permalink
सुगंध देणे,मिटून जाणे
सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!
मस्त............हा शेर खुप आवडला
दशरथयादव
शनि, 20/11/2010 - 20:03
Permalink
जगोत किंवा मरोत कोणी तमा
जगोत किंवा मरोत कोणी तमा कुणाला?
लखाखणारा सुराच आता ऋणात माझ्या!
supriya.jadhav7
शुक्र, 26/11/2010 - 12:33
Permalink
मनःपूर्वक आभार. -सुप्रिया.
मनःपूर्वक आभार.
-सुप्रिया.
सुरेश शिरोडकर
गुरु, 02/12/2010 - 18:56
Permalink
फारच छान गझल. आवडली.
फारच छान गझल.
आवडली.
supriya.jadhav7
शुक्र, 21/01/2011 - 19:33
Permalink
धन्यवाद सुरेशजी!
धन्यवाद सुरेशजी!
मयुरेश साने
शनि, 22/01/2011 - 23:26
Permalink
जगोत किंवा मरोत कोणी तमा
जगोत किंवा मरोत कोणी तमा कुणाला?
लखाखणारा सुराच आता ऋणात माझ्या!
सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!
बहारदार....
चित्तरंजन भट
बुध, 02/02/2011 - 15:30
Permalink
सुगंध देणे,मिटून जाणे
सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!
वाव्वा!
कमलाकर देसले
शुक्र, 04/02/2011 - 21:11
Permalink
सुप्रीयाजी ,गझल बेहद आवडली
सुप्रीयाजी ,गझल बेहद आवडली .प्रत्त्येक शेर खणखणी आहे
supriya.jadhav7
शनि, 26/03/2011 - 22:23
Permalink
मनःपुर्वक आभार!
मनःपुर्वक आभार!
क्रान्ति
रवि, 27/03/2011 - 11:11
Permalink
कुबेर आणि अबोली खास!
कुबेर आणि अबोली खास!
कैलास गांधी
बुध, 04/04/2012 - 13:26
Permalink
सुगंध देणे,मिटून जाणे
सुगंध देणे,मिटून जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली तनात माझ्या!
क्या बात है !