दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते

मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते

रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते

सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते

शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते

चंद्र तार्‍यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते

ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?

गझल: 

प्रतिसाद

अरे मिल्या ......मित्रा बहोत खुब.....

अभिनन्दन आवडली ! शेवटाने गझलेला १० पट समर्थ बनवली.

ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते

आहा क्या बात है

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?

मस्तच

मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते..............वा

सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?................. वा वा

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?............... वाह मिल्या वाह सुन्दरच

मस्त गझल

मार डाला!!! क्या बात है!!! संपुर्ण गझल अप्रतिम!

ब्युटी!!!!!

सुंदर....

सगळ्याच द्विपदी अतिशय उत्तम! खूप खूप आवडली गझल!

बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
फार सहज...

शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
वाव्वा..

एकंदर गझल अगदी छानच झाली आहे.

सुंदर....

चंद्र तार्‍यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते

ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते

चाल करुनी... तो पहा... आलाच मृत्यू
रोज का संधी अशी चालून येते?