चेहरा दे कोणताही बाटतो का आरसा ? ...........

सोवळ्याचा सोस - पाळा पुर्वजांचा वारसा
चेहरा दे कोणताही -बाटतो का आरसा ?

मी भला माणूस होतो - राहिलो निस्संग मी
पत्थराच्या पास कोणी - ठेवतो का आरसा ?

हासती माझ्यावरी - ते - बोलती "वेडा" मला
हासणार्‍या सांग रे ! - "तू " टाळतो का ? आरसा !

गोठलेल्या आसवांनी - गाडल्या मी "त्या" स्म्रुती
कोण दाटे लोचनी ते दावतो का ? आरसा !

लाख जोंबाळा असत्ये या जगाला जिंकण्या
जे खरे ते दाविल्याविण राहतो का आरसा ?

मयुरेश साने..दि.२९-ऑक्टोबर-२०१०.

गझल: 

प्रतिसाद

लाख जोंबाळा असत्ये या जगाला जिंकण्या
जे खरे ते दाविल्याविण राहतो का आरसा ?

भन्नाट शेर.

गझल आवडली.

लाख जोंबाळा असत्ये या जगाला जिंकण्या
जे खरे ते दाविल्याविण राहतो का आरसा ?

भन्नाट शेर.

गझल आवडली.

छान रचना.

सोवळ्याचा सोस - पाळा पुर्वजांचा वारसा
चेहरा दे कोणताही -बाटतो का आरसा ?

एक शंका आहे.
या आपल्या मतल्यात आरसा (हे वस्तुचे नाव) हा शेवट आहे असे निश्चीत झालेले नाही. इथे फारसा, गारसा, का रसा? असे शेवटही चालले असते. आपण वापरलेला आरसा ही पुनरावृत्ती वाटते आहे. मार्गदर्शन करावे.