ते सिंह गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले...................

त्यांच्याच सांगण्याने सत्कार रोज झाले
ते सिंह गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले

कोमेजला कसा रे ! प्राजक्त अंगणाचा
ते कागदी फुलाला - "जाई - जुई" म्हणाले

मी सांधले इथे ते - "नाते"- असे रफूचे
ते टोचले मला "मी" - "छद्मी सुई" - म्हणाले

सोयी नुसार त्यांनी - केले -"हिमा"- प्रमाणे
ते सोय पाहुनी - "मी"- आहे रुई म्हणाले

त्यांची जमीन आहे - मिंधी - मुजोर सत्ता
जे तारतील त्यांना -त्यांना - भुई म्हणाले

मयुरेश साने...दि ०४-ओक्ट-10

गझल: 

प्रतिसाद

मतला???

शेर सगळेच उत्तम.

सुधारणा केली आहे (मतला ......टाकलाय...)

आता इथे "कुणीसे" मृण्मई म्हणाले
तुझेच शेर- तेथे -ते -"अन्वई" म्हणाले

"हिमालयासम"