...पण सुरूच आहे रहदारी !

.......................................
...पण सुरूच आहे रहदारी !
.......................................

रस्त्यावर मेली म्हातारी...
...पण सुरूच आहे रहदारी !

विचार यावर किती किती हा..
मी बनेन म्हणतो अविचारी !

मी जगात माझ्या रमलेला...
मज नको तुझी दुनियादारी !

हृदयाची होते मेंदूशी
का आजकाल मारामारी ?

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !

काम कधी, तर मद-मोह कधी
तू हिंड मना दारोदारी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !

***मस्त!

तंत्र?

सुरेख...

हृदयाची होते मेंदूशी
का आजकाल मारामारी ?

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !

हे दोन शेर खासच....

@ शाम..

ही मात्रावृत्तातील गझल आहे.प्रत्येक ओळीत १६ मात्रा आहेत.

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !

अप्रतिम!!!!

डॉ. साहेब, माझे जरा मोजण्यातच चुकले होते..

मला तरी हे 'आठ वेळा गा' चे वृत्त वाटले. प्रदीपराव सांगतील.

गझल आवडलीच.

'आठ वेळा गा' असे असल्यास दुसरा व शेवटचा शेर वाचायला अवघड गेले.

'मात्रावृत्त' असे 'वेगळ्या' दृष्टिकोनातून बघणे शक्य नसले तरी समजा पाहिले तरीही तेच शेर (व दोन मिसरे सलग - त्याच शेरांचे) वाचायला किंचित अवघड गेले.

मतला, शेजारी व जरतारी हे शेर विशेष आवडले.

धन्यवाद व चु.बु.द्या.घ्या.

-'बेफिकीर'!

रस्त्यावर मेली म्हातारी...
...पण सुरूच आहे रहदारी !

वाव्वा.

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !
वाव्वा! क्या बात है. फार मस्त.

प्रदीपराव, गझल नेहमीप्रमाणे आवडली.

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !
वा! प्रदीप हा शेर काय जमलाय! मस्तच. गझल आवडलीच.

रस्त्यावर मेली म्हातारी...
...पण सुरूच आहे रहदारी !

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !

प्रदीप गझल नेहमीप्रमाणेच सुंदर , वरील ३ खूप आवडले

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !

चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !

हे शेर फार आवडले.

गझल नेहमीप्रमाणे आवडली.

भनाट

मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !