मनाला किती अन् कसे आवरावे?
मनाला किती अन् कसे आवरावे?
कधी मेघ होई कधी रानरावे..
घराला घराचे न उरलेच काही
कसे वादळाला अता घाबरावे?
नसे आत जागा नव्या वेदनांना
तरी घाव कोणी नव्याने करावे?
रिते आज सारे झरे आसवांचे
कसे लोचनांनी अता पाझरावे?
नभाला तसे रोज मी पांघरीतो
कधी त्या नभाने मला पांघरावे...
जरा शांत होता मनाचे किनारे
तुझी याद येता पुन्हा हादरावे...
( तुझ्या यौवनाचे किती बारकावे
कसे दोन डोळ्यांनि ध्यानी धरावे? )
गझल:
प्रतिसाद
supriya.jadhav7
मंगळ, 12/10/2010 - 22:13
Permalink
जरा शांत होता मनाचे
जरा शांत होता मनाचे किनारे
तुझी याद येता पुन्हा हादरावे...
हा खूप आवडला.
आनंदयात्री
गुरु, 14/10/2010 - 11:34
Permalink
शेवटचा वेगळा वाटला...
शेवटचा वेगळा वाटला...
अजय अनंत जोशी
रवि, 17/10/2010 - 18:40
Permalink
फार छान गझल आहे ही. घराला
फार छान गझल आहे ही.
घराला घराचे न उरलेच काही
कसे वादळाला अता घाबरावे?
हा शेर उत्तम.
वादळाला कशाला घाबरायचे असा प्रश्न विचारण्यापेक्षा वादळाला आता कसे घाबरायचे हा प्रश्न खूपच वेगळा आणि आकर्षक वाटला.
शाम
मंगळ, 19/10/2010 - 22:45
Permalink
नचिकेत, अजय्,सुप्रिया,
नचिकेत, अजय्,सुप्रिया, सर्वांचे मनःपुर्वक आभार..!