भरावे शेत वात्सल्यात...

भरावे शेत वात्सल्यात पाटांनी जुन्या
पडे पाणी नवे जेथे रहाटांनी जुन्या

अता बोलेन तैसा जग मला स्वीकारते
तसे वैतागले होतेच भाटांनी जुन्या

नवा आजार येतो; राहतो बेवारशी...
दवाखाने पहा भरलेत खाटांनी जुन्या

बरे झाले कि झाल्या बंदशा वाटा नव्या..
तसे बोलावले होतेच वाटांनी जुन्या

पहा; मोठ्या महाली आज मीही राहतो...
तरी का आठवे उष्टेच ताटांनी जुन्या..?

कधी करतोच धिंगाणा, कधी जल्लोष मी...
कधी रमतो पुन्हा स्वर्गीय थाटांनी जुन्या

कितीही वेचले सारे नवे मोती 'अजय'...
किनारी आठवण येतेच लाटांनी जुन्या

गझल: 

प्रतिसाद

भरावे शेत वात्सल्यात पाटांनी जुन्या
पडे पाणी नवे जेथे रहाटांनी जुन्या

वा ! छान गाझल...
'भरावे' च्या ठिकाणी भिजावे केले तर ?

पहा; मोठ्या महाली आज मीही राहतो...
तरी का आठवे उष्टेच ताटांनी जुन्या..?

व्वा चांगली गझल....

वैभवनी सुचवलेला बदल चांगला वाटतोय...

अता बोलेन तैसा जग मला स्वीकारते
तसे वैतागले होतेच भाटांनी जुन्या

सही! आवडली गझल.

कितीही वेचले सारे नवे मोती 'अजय'...
किनारी आठवण येतेच लाटांनी जुन्या

ब्युटी!!!

वैभवदादाने सुचवलेला बदल छान.

नवा आजार येतो; राहतो बेवारशी...
दवाखाने पहा भरलेत खाटांनी जुन्या

वा !

अता बोलेन तैसा जग मला स्वीकारते
तसे वैतागले होतेच भाटांनी जुन्या

व्वा अजयजी!! सुंदर गझल.....आवडली

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!

बरे झाले कि झाल्या बंदशा वाटा नव्या..
तसे बोलावले होतेच वाटांनी जुन्या

वा!

कितीही वेचले सारे नवे मोती 'अजय'...
किनारी आठवण येतेच लाटांनी जुन्या

वाहवाच वा वा!!!

अल्टीयम गझल.

मतल्यात बदल करावा लागेल. अर्थाचा गोंधळ होतोच आहे. वैभवची सुचना योग्य आहे.