देवुनी तुझे तुला निघायचे मला..

देवुनी तुझे तुला निघायचे मला
वेगळे तुझ्याविना जगायचे मला..

रावणापरी तुझे कुकर्म पाहिले
चेहरे तुला किती?बघायचे मला..

झेप घ्यायचो पुन्हा पडायचोच मी
लोक आपलेच हे नडायचे मला..

बोललो जसे, तसेच वागलो तरी
'चांगला'कुणीच ना म्हणायचे मला..

माणसेच माणसास जगवितात ना?
फत्तरास अन् तरी पुजायचे मला?..

मैफलीत मी कसे रमायचे इथे
मी फकिर हिंडुनीच गायचे मला..

सांगतोय 'शाम', का लिहायची गझल
मरण झेलुनी इथे उरायचे मला..

गझल: 

प्रतिसाद

छान गझल!

माणसेच माणसास जगवितात ना?
फत्तरास अन् तरी पुजायचे मला?.

गझल प्रचंड आवडली. मक्ता विषेश!

चवथा शेर अप्रतिम! गझल छानशी!

-'बेफिकीर'!

सहाव्या शेरामध्ये फकीर हवंय...

नचिकेत, अजय, बेफिकीर ,ह बा, सर्वांचे मनःपुर्वक आभार..! आणि निर्मळ सूचनांचे स्वागत...

नवीन आहे..सांभाळा.