बदनाम..

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?...

कळले असेल आता रडले पुन्हा पुन्हा का?
जखमा नवीन होत्या नाजूक काळजाला...

ढळता उन्हे तशी ती जाते विरून छाया
हा शाप सावलीला देवा दिला कशाला?...

मीरा तुझ्याचपायी प्याली जरी विषाला
बदनाम 'शाम' तू रे नाही कधीच झाला...

गझल: 

प्रतिसाद

सुंदर...
कल्पना जुन्याच असल्या तरी, मांडणी आवडली..
शेवटचा मस्त!

हे ही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?.

व्वा!

वाहवा.... चांगली गझल...
बेफिकीरांनी नमुद केलेला शेर चांगला जमलाय.. शुभेच्छा.

कैलास , बेफिकीर ,आनंदयात्री
आपल्या मनमोकळ्या प्रतिसादाने खूप हुरुप आलाय..
खूप खूप धन्यवाद !....

हेही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?..

वा...

मक्ता सुंदर!!

आनंदयात्री ,बेफिकीर, कैलास, चित्तरंजन भट, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद!

आपल्या स्नेहाची अशीच बरसात लाभो हीच आभिलाषा..

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

सगळी गझल अप्रतिम झालिये.

धन्यवाद!!! ह बा.

बढिया है...

मीरा तुझ्याचपायी प्याली जरी विषाला
बदनाम 'शाम' तू रे नाही कधीच झाला...

शेवटचा शेर खुप आवडला

मीरा तुझ्याचपायी प्याली जरी विषाला
बदनाम 'शाम' तू रे नाही कधीच झाला...

शेवटचा हा शेर खुप आवडला.

विद्यानंद ,नेहा,सुप्रिया...सर्व सहृदयींचे धन्यवाद!!