मी तसा माणूस आहे

याचनेत बनाव माझ्या
अंतरी पण हाव माझ्या

जखम भरली, पण मनावर
खोल झाला घाव माझ्या

आत हरलो, चेहर्‍यावर
जिंकल्याचा भाव माझ्या

नेभळट मी! धाडसाची
काय चर्चा राव माझ्या?

चोरट्यांची काय भीती?
सोबतीला साव माझ्या

ती न यावी हा असे का
प्रीतिचा पाडाव माझ्या?

आज आली ह्या इथे ती
रे मना भांबाव माझ्या

मी तसा 'माणूस' आहे
'विजय' देहा नाव माझ्या

गझल: