जरासा त्रास होतो

कुणाचा भास होतो
जरासा त्रास होतो

तुझ्या रानात माझा
बरा वनवास होतो

जशी तू देव होते
तशी आरास होतो

रुपेरी पैंजणांचा
रुपेरी फास होतो

तुझ्याशी भांडतो पण
मलाही त्रास होतो

कुणाचे अन्न उष्टे,
कुणाचा घास होतो

जनांची चाकरी पण
मनाचा दास होतो

कशाला ’क्लास’ लावू?
तसा मी पास होतो

तुझा उपयोग आता
मला गाण्यास होतो

--- ह्रषिकेश् चुरी

गझल: 

प्रतिसाद

वाहवा.. क्या बात है...

छोट्या बहरातली.. पण आशय अभिव्यक्तीत एक वेगळीच उंची गाठलेली गझल.

चांगलीय चांगलीय! लहान मीटर आहे पण वनवास, त्रास, पास आणि गाण्यास हे शेर मस्त वाटले. अभिनंदन!

तुझ्याशी भांडतो पण
मलाही त्रास होतो

कुणाचे अन्न उष्टे,
कुणाचा घास होतो

कशाला ’क्लास’ लावू?
तसा मी पास होतो

वाहवा.. क्या बात है...

त्रास ,दास,घास मस्तच.

सुन्दर कल्पना................. नवेपण

सुन्दर कल्पना................. नवेपण

कुणाचा घास होतो.. त्रास होतो.. पास होतो... आवडली. अभिनंदन.