ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी

ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी
ती कोठे सगळी वर्षे गळली माझी ?

त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी

नेहमीसारखे तुला भेटण्यासाठी
पावले कितीदा मागे वळली माझी

एवढा कशाचा माज तुझ्या चाफ्याला ?
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी

मग मिठीतही एकटे वाटले तेव्हा
तू ओळ कोणती उरी कवळली माझी?

पाडून भाव का सांगतेस तू माझा?
जा! मलाच आहे किंमत कळली माझी!

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी

मी प्रशांत होतो, जेव्हा दुःखी होतो
बघ ही प्रशांतता किती खवळली माझी

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी

नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी

गझल: 

प्रतिसाद

त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी

फार आवडला,.....
पुलेशु

एवढा कशाचा माज तुझ्या चाफ्याला ?
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी

अतिशय सुरेख! दुपार, हयात, किंमत या द्विपदीही खासच. मस्त गझल!

ओह ओ!

चित्तरंजन,

दणदणीत! हे शेर फारच आवडले म्हणून येथे लिहीत आहे.

मी प्रशांत होतो, जेव्हा दुःखी होतो
बघ ही प्रशांतता किती खवळली माझी

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी

नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी - या शेराला टाळ्या!

नेहमीसारखे तुला भेटण्यासाठी - याला अ‍ॅडव्हान्स दाद दिलेली होती, पण पुन्हा एकदा!

"जा, मलाच आहे किंमत कळली माझी" - यातील रुसव्याची छटा फारच उत्तम!

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी - सुंदर शेर!

अभिनंदन! गझल आवडलीच! 'नुकतेच तुला आठवून झाले थोडे' हा मला सर्वोत्कृष्ट वाटला.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बघ प्रशांतता ही किती खवळली माझी - असे एकदा वाचून पाहिले. हा शेर जबरदस्त आहे.

हसलीस जरा पाने सळसळली माझी - वा वा!

सुरेख... सुरेख.

त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी

सुंदर

नेहमीप्रमाणे तुला भेटण्यासाठी
पावले कितीदा मागे वळली माझी

वा... वा... वा...

एवढा कशाचा माज तुझ्या चाफ्याला?
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी

क्या बात है

पाडून भाव का सांगतेस तू माझा?
जा! मलाच आहे किंमत कळली माझी!

छानच...

अस्मादिकांचा एक खूप जुना शेर आठवला

भाव मी माझा किती पाडून देऊ?
हाय, कोणाशीच सौदा ठरत नाही!

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी

अप्रतिम...

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी

जोरदार...

नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी

ओहो... सुंदर कल्पना. सुंदर शेर.

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी

शब्दांचे कुंटणखाने...! उत्कृष्ट....

एकंदरीत खणखणीत झाली आहे गझल. येऊ द्या आणखी.

५,६,७,८,११ खूप आवडलेत.

पाडून भाव का सांगतेस तू माझा?
जा! मलाच आहे किंमत कळली माझी!

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी

मी प्रशांत होतो, जेव्हा दुःखी होतो
बघ ही प्रशांतता किती खवळली माझी

वा व्वा..अगदी उत्तम.आवडली गझल.

ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी
ती कोठे सगळी वर्षे गळली माझी ?

वा.

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी
सही!
दोन्ही शेर आवडले. गझल छान.

ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी
ती कोठे सगळी वर्षे गळली माझी ?

त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी

मग मिठीतही एकटे वाटले तेव्हा
तू ओळ कोणती उरी कवळली माझी?

पाडून भाव का सांगतेस तू माझा?
जा! मलाच आहे किंमत कळली माझी!

मी प्रशांत होतो, जेव्हा दुःखी होतो
बघ ही प्रशांतता किती खवळली माझी

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी
शेर आवडले.
गझल नेहमीप्रमाणे छानच..!!!

वाहवा!
गझल आवडली.

लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी

-सुरेख.

चित्तरंजन गझल आवडली बरं का. एखादी वाट मळली जाते तशी हयात मळली जाणे ही कल्पना अभिनव आहे. तुमच्या शेरातला आशय अगदी बहुपेडी असतो. त्यामुळे ते अधिकच भावतात.

वाह चित्त!
खूप प्रसन्न वाटलं तुमची गझल वाचून.

का कोण जाणे सुरेश भटांचा हा शेर आठवला,

मला आणून दे आधी जुन्या खाणा-खुणा माझ्या
तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता!

तुमची ती खिळखिळी वही हे म्हणतेय का?

तो मलाच माझे शब्द ऐकवत होता
लायकी मलाही अखेर कळली माझी
फारच छान!

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी
मला सर्वात आवडलेला शेर. या शेरामुळे 'निष्कारेण वेदाभ्यासः' हे आठवले. वा! वा!!

मी प्रशांत होतो, जेव्हा दुःखी होतो
बघ ही प्रशांतता किती खवळली माझी
.... दुसरी ओळ समजली नाही.

नेहमीसारखे तुला भेटण्यासाठी
पावले कितीदा मागे वळली माझी
नेहमीसारखे चे प्रयोजन प्रसंगासाठीच आहे ना? = (नेहमीसारखं) ?

पाडून भाव का सांगतेस तू माझा?
जा! मलाच आहे किंमत कळली माझी!
या शेराचा आशयही आवडला. पण.... 'मलाच' चे प्रयोजन? म्हणजे 'च' चे?

गझल आवडली.

@प्रज्ञा
धन्यवाद.

@मनीषा
धन्यवाद.

मला आणून दे आधी जुन्या खाणा-खुणा माझ्या
तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता!

तुमची ती खिळखिळी वही हे म्हणतेय का?

नाही खरे तर. गेलेल्या आयुष्याला बहुधा कवी खिळखिळ्या झालेली वहीत शोधतो आहे.

@अजय

नेहमीसारखे चे प्रयोजन प्रसंगासाठीच आहे ना? = (नेहमीसारखं) ?

नेहमीप्रमाणे हवे खरे तर तिथे. मनोगतावर नेहमीप्रमाणे आहे.
बाकी अर्थ काढाल तसा. उदा.
१. आपण पूर्वी जसे भेटायचो तसे भेटण्यासाठी पावले सारखी मागे वळत होती.
२. तुला भेटण्यासाठी निघालो तेव्हा चालताना पावले सारखी मागे वळत होती. हा आता एक नेमच झाला आहे
....
....

जा! मलाच आहे किंमत कळली माझी!

'च' वापर जोर देण्यासाठी आहे. (एम्फॅटिक )

चित्तरंजन,
बरोबर आहे. नेहमीसारखे नंतर स्वल्पविराम हवा होता असे वाटते.
धन्यवाद.

अतिशय सुन्दर............
५,६,११ मनास भवले

वाहवा!

फारच छान गझल.
आवडली.

गझल खूप आवडली!!

वेगळ काय लिहू?
मजा आली!

ती जुनी वही दिसली खिळखिळली माझी
ती कोठे सगळी वर्षे गळली माझी ?

त्या पिंपळपारावरच्या अवखळ गप्पा
हसलीस जरा पाने सळसळली माझी

मी कधी चाललो मजल गाठण्यासाठी?
ही हयात आहे अशीच मळली माझी

नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी

वा....गझल आवडली.....

भ्न्नाट

एवढा कशाचा माज तुझ्या चाफ्याला ?
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी

चित्त... मला वाटतं.. पुढची गझल ड्यू आहे... :)

फारच छान गझल.
आवडली.