समिकरणे

उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे!

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

गझल: 

प्रतिसाद


उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

वाव्वा. क्रांती, सुरेख गझल.

अप्रतिम गझल...!!!
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

लाजवाब!!!

व्वा क्या बात है.....
तरणे आणी शेवटचा शेर खूप छान.

डॉ.कैलास

अत्यंत सुंदर गझल क्रान्ती! इतरत्र प्रतिसाद दिलाच होता. अभिनंदन!

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे!... वाह.. क्या बात है!
म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!) ... वाह वैशिष्ठ्यपूर्ण शेर
-मानस६

ही गझल मी वाचलीच नव्हती.. अप्रतिम.

सुंदर गझल!!

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!) >>

सुरेख!

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?
छान शेर!

सुंदर सुंदर......खूप छान गझल क्रांती...मक्त्याला तर सलामच :)

आज दिवसभर काही वाचायलाच नको आता.

वा! अतिशय सुरेख गझल. खूप आवडली.
सोनाली

वाह क्रांन्ती!
एकदम वेगळच काही?
क्रांती ने क्रांती केली!
आता आम्ही तुला गझलेची मर्ढेकर म्हणू ?
क्या बात है!
मस्त!