हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा

हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा

कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा

युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा

किती खोल मी अजून जावे मनात माझ्या
कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा

उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा

अता एकदा संपावी काव्याची वेणा
मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा

गझल: 

प्रतिसाद

वा. अनिरुद्धराव, मस्त झाली आहे गझल. सगळेच शेर आवडले.

हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा

व्वा.... सगळेच शेर उत्तम....

स्वप्नलिपी,जन्म-मरणाचे प्रतल्, ट्विटर वरील आय.डी... अहाहा मस्त संकल्पना...

अता एकदा संपावी काव्याची वेणा
मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा

यातील ''वेणा' ' अर्थ उमगला नाही..... कृपया अवगत करावे ही विनंती.

डॉ.कैलास

सुंदर गझल.

कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

व्वा अनिरुद्ध,
कधी न संपो या वेणा वा प्रसववेदना
या दु:खातून शतगझलांना जन्म मिळावा

कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा

अनिरुद्ध,
वाह क्या बात है !!
कधी न संपो या वेणा वा प्रसववेदना
या दु:खातून शतगझलांना जन्म मिळावा

किती खोल मी अजून जावे मनात माझ्या
कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा

उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा

व्वा व्वा! आवडले!!

सगळे शेर आवडले.

वाहव्वा.. सुरेख गझल !
सगळेच शेर आवडले.

सुरेख!!!!!!!

सगळी गझल काबीले तारीफ झालीये...

युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवरी तूही उघडावा

हा शेर खूप आवडला.

अनिरुध्दा,
सगळेच शेर मस्त!
जयन्ता५२

गझल खुप छान झाली आहे..

जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा

अधिक आवड्ला!!!

वाहवा ! आवडली .उत्तम गझल.