पापणी अद्याप माझी...

पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही

श्रावणातच पाहुनी घ्यावे धरेला
एरवी इतकी कधी ती नटत नाही

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

सर्व देणी फेडता येतात येथे
कर्ज मायेचे कधीही फिटत नाही

लांब, मोठा दिवस हा जातो कसाही
आणि छोटी रात्र कटता कटत नाही

गझल: 

प्रतिसाद

पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही

व्वा.

श्रावणातच पाहुनी घ्यावे धरेला
एरवी इतकी कधी ती नटत नाही

व्वा.

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

वाव्वा. फार आवडला.

स्वच्छ देखणी झाली आहे पूर्ण गझल. मस्त.

संपुर्ण गझल आवडली. खूप छान!!!

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

डॉ.कैलास

पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही

श्रावणातच पाहुनी घ्यावे धरेला
एरवी इतकी कधी ती नटत नाही

सुरेख.

सुंदर!
सर्व देणी फेडता येतात येथे
कर्ज मायेचे कधीही फिटत नाही
व्वा!!

सुंदर!
सर्व देणी फेडता येतात येथे
कर्ज मायेचे कधीही फिटत नाही
व्वा!!

सर्व देणी फेडता येतात येथे
कर्ज मायेचे कधीही फिटत नाही
अप्रतिम.
सुरेख गझल.

मायेचे : प्रेमाचे आणि आईचे दोन्ही दृष्टीने सुंदर.

सगळे शेर अगदी सहज वाटत आहेत. मतला फारच आवडला. शुभेच्छा.

धन्यवाद, मित्रांनो.

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

व्वा व्वा...हा शेर खुप आवडला.मस्त.छानच...

धन्यवाद, निलेश

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

वा व्वा ,फारच छान ....

लांब, मोठा दिवस हा जातो कसाही
आणि छोटी रात्र कटता कटत नाही

सुंदर.. आवडली मला

धन्यवाद,
स्नेहदर्शन.

सुरेख! सगळ्याच द्विपदी सरस, कर्ज तर अत्युत्तम!

धन्यवाद, क्रांती.

केदार,

अतिशय सुंदर गझल! अभिनंदन! सगळेच शेर उत्तम!

धन्यवाद!

- 'बेफिकीर'!

नवा शेरः
स्वप्न एकच पाहतो वर्षानुवर्षे
आणि अजुनी रंग त्याचा विटत नाही

भावली, सहज आणि सुन्दर...............