चालतो ऐसा जणू ....

मी धरा झालो सुखे अन जाहली अंबर
'मी तुझ्या डावात नाही' ती म्हणाल्यावर

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

भात झाला तिखट फिश्टीचा कदर नव्हती
यारिचा चवदार थर होताच की त्यावर

पोर शूद्राचे न शकले वाजवू घंटा
बामणाने घेतले उचलून खांद्यावर!

बांधुनी गेलीस पाया ताजमहलाचा
अन तिथे बांधु कसा हे एकट्याचे घर?

ह. बा.

गझल: 

प्रतिसाद

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

फार छान.

पोर क्षूद्राचे न शकले वाजवू घंटा
बामणाने घेतले उचलून खांद्यावर!

शूद्राचे असायला हवे का? हा शेर आणि मथळा फार कळला नाही.

पोर क्षूद्राचे न शकले वाजवू घंटा
बामणाने घेतले उचलून खांद्यावर!.. व्वा.

बांधुनी गेलीस पाया ताजमहलाचा
अन तिथे बांधु कसा हे एकट्याचे घर? अप्रतिम.

बामणाने ऐवजी पुजार्‍याने/सवर्णाने चांगले राहीले असते असे वाटते.
जात/जमातीविषयक थेट शब्द टाळायला हवे, असेही वाटते.

बांधुनी गेलीस पाया ताजमहलाचा
अन तिथे बांधु कसा हे एकट्याचे घर?

अहाहा.... चांगली गझल हबा....
( मुंबईत साथ आहे... पण नवी मुंबई कंट्रोल्ड आहे )

डॉ.कैलास

चित्तरंजनजी,
शूद्राचे योग्य आहे तसा बदल करण्याची विनंती मी विश्वस्ताना करेन.

पोर क्षूद्राचे न शकले वाजवू घंटा
बामणाने घेतले उचलून खांद्यावर
घेतल्यास... भेदाच्या प्रदर्शनात पाहिलेले मानवतेचे चित्र, आशावाद, अपेक्षा असा काहीतरी अर्थ होऊ शकतो. (पण माझ्यासाठी तो वेगळ्याच भुमिकेतून/पाहिलेल्या प्रसंगातून/वातावरणातून आला आहे.)

मतला कळण्यास काही अडचण आहे असे वाटत नाही.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे!!!

गंगाधरजी,
आपला दृष्टीकोण बरोबर आहे. पण अर्थाच्या दृष्टीने मला तो शब्द खटकला नाही. मला भेदाचे खंडन अपेक्षीत होते म्हणून तोच शब्द वापरला.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे!!!

कैलास गुरूजी,
फक्त कॉपी पेस्ट? विध्यार्थ्यांनी काय समजावे? गझल चांगली की वाईट?
(मुंबईतल्या साथींनी काम वाढलेले दिसतेय.)
प्रतिसादाबद्दल आभारी आहे!!!

एवढी खांद्यावर उचलून धरले की भेद अजूनच गहिरा झाला असे बहुधा तुम्हाला म्हणायचे असावे असे मी गृहीत धरतो. (चांगली कल्पना आहे.) असे असल्यास बामणाने हा शब्द अनावश्यक स्टंटबाजी ठरतो.

मी धरा झालो सुखे अन जाहली अंबर
'मी तुझ्या डावात नाही' ती म्हणाल्यावर

डावात नसणे ह्याचा अर्थ सांगावा.

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

वाव्वा !

बांधुनी गेलीस पाया ताजमहलाचा
अन तिथे बांधु कसा हे एकट्याचे घर?

सुंदर !
इतर शेरांमधले विचारही वेगळे, आकर्षक वाटले.
मांडणीबद्दल तसे म्हणू शकत नाही.

पुलेशु.

चित्तरंजनजी,

"डावात नसणे ह्याचा अर्थ सांगावा."

लहानपणी च्या खेळात रुसारुशी झाली की "आमी नाय तुमच्या डावात जावा बाबा" असं म्हणून गट्टी फू करणारी बालमैत्रीण... इ.इ.इ.

ज्ञानेश,
आभारी आहे.

वा हबा. गझल आवडली.

धन्यवाद बहर!!!

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर

क्या बात है!!

गांधीजी,
धन्यवाद!

त्या जुन्या शाळेपुढे मी मारतो चकरा
चालतो ऐसा जणू पाठीवरी दप्तर
ह बा जी हा खरा शेर लिहीलात.आपल्याही अनुभवाचा.आपलाच वाटणारा.मस्त.

धन्यवाद निलेश!!