कधी स्वतःच्या ...

कधी स्वतःच्या जगण्यालाही विटलो
कधी अचानक श्वास कुणाचा ठरलो

किती, काय अन् कशाकशाचे सांगू...
कुणाकुणासाठी मी दाने हरलो

कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो

जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो

धरती इतकी चिंब कशाने झाली ?
कसा? कुठे? मी... केंव्हा? कधी बरसलो ?

मित्र म्हणावा असा कुणीच मिळेना
जो शत्रू नव्हता त्याचा मग बनलो

पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो

वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो

गझल: 

प्रतिसाद

जगा न जमली चाल जराही माझी

ही ओळ..... आणि

पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो

हा शेर फार आवडला...

डॉ.कैलास

व्वा अजयजी !
बर्‍याच दिवसांनी टाकलीत.खुप आवडली गझल.
खालील शेर विशेष आवडले.

कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो

जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो

पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो

वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो

पडलेल्यांना हात देत सावरले
म्हणून थोडा मागे मागे पडलो

वा!

कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
.
जगा न जमली चाल जराही माझी
जगासारखे थोडे मग सरपटलो
.
वादळ उठवावे असे न केले, पण...
जीवन माझे विश्वासाने जगलो

हे विशेष आवडलेत.

सर्वांना मनापासून धन्यवाद!

गझल छान झाली आहे. असेच लिहीत राहा.

अजयजी,
आपल्या गझल मनाला भावणारा एक सच्चा, अनुभवी धागा असतो. वाचता वाचता आपण होऊन त्यात गुरफटावेसे वाटते.

जीवन माझे विश्वासाने जगलो
..........क्या बात है||
हे म्हणायला हिम्मत पाहिजे.येरागबाळ्याचे काम नाही.
धन्यवाद.

चित्तरंजन अनिल धन्यवाद!

खास! आवडली गझल.

मित्र म्हणावा असा कुणीच मिळेना
जो शत्रू नव्हता त्याचा मग बनलो

छान गझल. चांगला शेर.

क्रांति, ह.बा. धन्यवाद!