इतकी सुंदर ढाल?

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल

मी रागाला गेल्यावरती तिने चुंबिला गाल
इतक्या कच्च्या वैर्‍यासाठी इतकी सुंदर ढाल?

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळत बसतो साल

स्वातंत्र्याच्या तबल्यावरती धरला कोणी ताल?
कानावरती येतच नाही का समतेची चाल?

आज हबाचे काय करावे ठरले होते काल
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!!

- ह. बा. शिंदे

गझल: 

प्रतिसाद

अरे बाप रे..जबरदस्त.

सर्वच शेर मस्त.

ह. बा., सगळ्याच द्विपदी चांगल्या झाल्या आहेत. खालील द्विपदी फार आवडल्या.

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल

वा.

स्वातंत्र्याच्या तबल्यावरती धरला कोणी ताल?
कानावरती येतच नाही का समतेची चाल?
वाव्वा..

आज हबाचे काय करावे ठरले होते काल
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!!

वाव्वा.

असेच लिहीत राहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळत बसतो साल

हा शेर एकदम दमदार.....

उत्तम गझल.
अभिनंदन हबा.

बिकट वाट वहिवाट नसावी धोपटमार्गा सोडू नको हा अनंत फंदींचा फटका या निमित्ताने आठवला.

डॉ.कैलास

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल

मी रागाला गेल्यावरती तिने चुंबिला गाल
इतक्या कच्च्या वैर्‍यासाठी इतकी सुंदर ढाल?

आज हबाचे काय करावे ठरले होते काल
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!!

वा..वा.. अप्रतीम गझल. सगळे शेर आवडले...

हबा....... ( एक सूचना : राग नसावा.... ''बघा '' ही रदीफ लावून बघा. )

असे केल्यास गझल ( लवंगलता ) या मात्रा वृत्तातील होईल.... अन तिचा गैरमुरद्दफ पणा ही निघून जाईल.

( याचा अर्थ ही गझल दोषपूर्ण आहे असे नव्हे.... या बदलांशिवाय गझल मूळताच उत्कृष्ट आहे. )

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल बघा
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल बघा

मी रागाला गेल्यावरती तिने चुंबिला गाल बघा
इतक्या कच्च्या वैर्‍यासाठी इतकी सुंदर ढाल? बघा

लुटतो गाभा रसिक खरा अन होतो मालामाल बघा
ज्ञानी आत्मा गांभिर्याने चघळत बसतो साल बघा

स्वातंत्र्याच्या तबल्यावरती धरला कोणी ताल? बघा
कानावरती येतच नाही का समतेची चाल? बघा

आज हबाचे काय करावे ठरले होते काल बघा
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!! बघा

डॉ.कैलास

मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल
वा.
आज हबाचे काय करावे ठरले होते काल
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!!

वाव्वा. क्या बात है!!!!!!

चित्तरंजनजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गंगाधरजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
कैलासजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
वैभव, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गांधीजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

...............................................
@कैलासजी(गुरूजी)

आपण सुचविलेले बदल नेहमीच छान असतात. हाही चांगला आहे. मला त्या वृत्ताचे नाव खुप आवडले.... "लवंगलता" आता या वृत्तात मी एक गझल नक्की लिहीणार आहे... लवंगलता.... मस्त नाव आहे.
गुरूजी, सध्या ही गझल कोणत्या वृत्तात आहे?

खल्लास केलत हबा!!! वा!!!! प्रत्येक शेर अन शेर आवडला! प्रत्येक शेराच वजन शेरात न मोजता येण्यासारखं आहे! क्या बात है. ह्या गझलेवर प्रेम करु द्या आम्हाल थोडं. रुग्णाला इतकी गोड औषधे एकदम देऊ नका... मधुमेह होयचा आणि मग मलाच एक गझल लिहावी लागेल.. कडू!! हा हा, विनोद वेगळे.. पण गझल भयंकर आवडली.

हंम्म्म्म्म्म्म्म....... हबा... वृत्त शोधावे लागेल....

http://www.sureshbhat.in/node/1704

:)

डॉ.कैलास

बहर,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

गुरूजी,
हे काही बरोबर नाही....

आज हबाचे काय करावे ठरले होते काल
टाळीवाचुन हाल करावे नंतर द्यावी शाल!!

ज...रा.. हझलेकडे झुकले आहे.

परवा तुम्हालाही टाळ्या मिळाल्या की..:)

अजयजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अहो राव.... मुशायर्‍याचा वृत्तांत द्या की...

डॉ.कैलास

खुप छान ह बा जी,

अख्खी गझल आवडली.आपल्या गझलेतील प्रत्येक शेराला येथूनच टाळी देतो.
प्रत्येक शेराचा मतलाही होईल ,नाही का?

कैलासजी, आपण अजयजींना म्हणताय ना?

निलेशजी,
मतलेच आहेत पाचही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

तुजला गाता गाता झाले सारे गवई लाल
गझले तुजविन झाले असते कित्तेकांचे हाल..

काय म्हणता ह बा?... खरे तर एकनाथांची ओवी आठवली होती..
ज्ञानेश्वरी मधील "ज्ञानेश्वरीपाठीं.....नरोटी ठेविली. पण रहावेना..

वाह! वाह!
मस्त!मस्त!
सर्व शेर जबर्दस्त!

शामजी,
छानच आहे तो शेर!

मनिषाजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.