किती सोपे मला हे प्रेम करणे वाटले होते...

किती सोपे मला हे प्रेम करणे वाटले होते..
सुखाचे स्वर्ग छोट्याशा सुताने गाठले होते!!

नशा, धुंदी, खुमारीने किती सांगू मला छळले..
मनाच्या अंगणी वादळ तुझे सोसाटले होते!!

मनाच्या ह्या कुरापाती स्वभावाला करू शिक्षा??
नको!..तेही तुझ्या हळव्या स्मृतींनी दाटले होते!!

तुझ्या "निष्काम" प्रेमाच्या वदंता ऐकल्या जेव्हा...
तुझे "ते" शब्द कुचकामीपणाचे वाटले होते.

जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील का वेडे..?
तुझ्या दारी 'तगादे' हुंदक्यांचे साठले होते!!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है बहर....
प्रत्येक शेर भन्नाट आहे.

किती सोपे मला हे 'प्रेम करणे' वाटले होते..
सुखाचे स्वर्ग छोट्याशा सुताने गाठले होते!!

जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील का वेडे...
तुझ्या दारी तगादे हुंदक्यांचे साठले होते!!

हे दोन्ही शेर अगदी भिडले.....

सुंदर गझल.

डॉ.कैलास

तोडलस भावा. लय भारी लिवलस.

मनाच्या ह्या कुरापाती स्वभावाला करू शिक्षा??
नको!..तेही तुझ्या हळव्या स्मृतींनी दाटले होते!!

वाहवा!!!

डॉक्टरसाहेब.. हबा... धन्यवाद! तुमचे प्रतिसाद नेहमीच प्रेरणा आणि उत्साह देणारे असतात.

मनाच्या ह्या कुरापाती स्वभावाला करू शिक्षा??
नको!..तेही तुझ्या हळव्या स्मृतींनी दाटले होते!
!

मस्त गझल.

किती सोपे मला हे प्रेम करणे वाटले होते..

ही ओळ फारच सहज आली आहे. सुट्या ओळी फारच छान.

गझल छानच झाली आहे.

मुटेसाहेब.. चित्तरंजनजी.. आभारी आहे. धन्यवाद.

मलाही सुटे मिसरे आवडले..

नशा, धुंदी, खुमारीने किती सांगू मला छळले..
मनाच्या अंगणी वादळ तुझे सोसाटले होते!!

जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील का वेडे..?
तुझ्या दारी 'तगादे' हुंदक्यांचे साठले होते!!

बहर खुप छान.आवडली गझल.

जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील का वेडे..?
तुझ्या दारी 'तगादे' हुंदक्यांचे साठले होते!!

--- वा,वा मक्ता आवडला!
जयन्ता५२

'बहर'दार गझल.
सूत, हुंदका आवडले.
धन्यवाद!

किती सोपे मला हे 'प्रेम करणे' वाटले होते..
सुखाचे स्वर्ग छोट्याशा सुताने गाठले होते!!

जराशी घेऊनी तसदी, कधी बघशील का वेडे...
तुझ्या दारी तगादे हुंदक्यांचे साठले होते!!

मार डाला!!!

सर्व प्रतिसादकांचे आभार!!