शक्य नाही

तुला मी भेटणेही शक्य नाही
असे मी राहणेही शक्य नाही

मनातिल स्वप्न माझे व्यर्थ आहे
तिला मी पाहणेही शक्य नाही

असा मी कायदा केला स्वतःशी
मला तो तोडणेही शक्य नाही

कुणी मज ओळखावे वाटते पण
मला, मी वाचणेही शक्य नाही

कुठे शोधू मला मी सापडेना
तिला मी मागणेही शक्य नाही

कसे आहे पहा हे विश्व माझे
जरासे हासणेही शक्य नाही

---स्नेहदर्शन

गझल: 

प्रतिसाद

कसे आहे पहा हे विश्व माझे
जरासे हासणेही शक्य नाही

ह्या शेरासारखी एकूण गझलच आर्त आहे. छान. लिहीत राहा.

मनातिल स्वप्न माझे व्यर्थ आहे
तिला मी पाहणेही शक्य नाही

आहाहा.... खुपच आर्तता भरली आहे प्रत्येक शेरात.
छानच गझल.

धन्यवाद

मतला आणि मक्ता फारच सुंदर. बाकी जाणकार सांगतीलच. गझल आवडली.

शुभेच्छा.