चांदण्या लेऊन झाला...

अंगणी ये कुंतलांना खेळु दे ना वारियावर
गंध झाले शब्द सारे दरवळूदे या नभावर

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

आज मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

मी घडीभर बोललेलो आसवांशी सांत्वनाचे
बोल माझे घेतले भलतेच दु:खानी मनावर

- ह्.बा.शिंदे

गझल: 

प्रतिसाद

वा वा हणमंतराव........ गझलियत च्या दिशेने चाललेली सुरेख वाटचाल.......

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

होय मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

हे तिन्ही शेर सुंदर... अभिनंदन.

डॉ.कैलास

ह बा... क्या बात है!!! प्रत्येक शेर आवडला! भन्नाट!

बहर,
तुमचा गझलेत उल्लेख केला आहे वाचला का?

हा हा!! हो. धन्यवाद. तुमच्या गझलेत स्थान मिळाले तरी खूप! हबा गझल खरच आवडली! अप्रतिम.

छान गझल, आवडली.

कैलासजी,

गझलियत च्या दिशेने चाललेली सुरेख वाटचाल...... मोगॉम्बो खुश हुआ!!!

बहरजी,
गंगाधरजी
धन्यवाद!

हबा... बहरच म्हणा मला... नावातली मजा जाते..(According to you only!)

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

आज मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

वेगळीच लय पकडतेय गझल ह बा..वा

मी घडीभर बोललेलो आसवांशी सांत्वनाचे
बोल माझे घेतले भलतेच दु:खानी मनावर
हा शेर आवडलाच.
बाकी शेर तेच प्रेमाचे जुने फॉर्मुले... पण मांडणी छान केलीत. फार चांगली म्हणत नाही वाईट म्हणता येत नाही... छान आहे.

बहर,
चुकून जी म्हटलो.

निलेशजी,
आपला आभारी आहे.

बापू,
प्रेमाचे नवे फॉर्मुले कळवावेत. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मी घडीभर बोललेलो आसवांशी सांत्वनाचे
बोल माझे घेतले भलतेच दु:खानी मनावर
खुप आवडले!!

गांधीजी (एक कैलासजी असल्याने इथुन पुढे हेच नाव घेईन म्हणतो...कसे?)
धन्यवाद!