श्वास

कोणते श्वास श्वासांसवे जागले ?
जाग आली तुझे भास रेंगाळले

भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले

ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?

साथ अदृश्य निःशब्द होती तुझी
फार नव्हते तसे एकटे वाटले

आजही जाणतो मंद चाहुल तुझी
दार नाही मनाचे अजुन गंजले

गझल: 

प्रतिसाद

मतला,

ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?

आणि
मक्ता खास आवडले.
गझल अप्रतिमच.

आवडली गझल.

शेवटचे तीन आवडले..

भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले

आजही जाणतो मंद चाहुल तुझी
दार नाही मनाचे अजुन गंजले
दोन्ही शेर मस्त

ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?

फारच सुरेख

गझल सुंदर झाली आहे.

ह बा, गंगाधर, आनंदयात्री, अच्युत - धन्यवाद

भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले

- छान

ही मिठी ओळखे शब्द अस्पष्टसे
ओळखावे कसे श्वास आपापले ?

- वा...वा...

आजही जाणतो मंद चाहुल तुझी
दार नाही मनाचे अजुन गंजले

- वा...उत्तम कल्पना.

प्रदीपजी - धन्यवाद

भेटण्याला नसावीतही कारणे
पण सुचावेत काही बहाणे भले

फारच सुरेख.

ओळखावे कसे श्वास आपापले ?
वा. ही ओळ मस्त!

आजही जाणतो मंद चाहुल तुझी
दार नाही मनाचे अजुन गंजले
वा. गझल आवडली.

छान! गझल आवडली!