करणार आहे

आज श्वास मी मोकळा भरणार आहे
मुक्त वाट डोळ्यांतुनी करणार आहे

मागची लढाई जरी बिनधास्त होती
आज मी युद्धाचा बळी ठरणार आहे

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

काळ होत मी बांधुनी कफनी ललाटी
आग ओकुनी वादळी उठणार आहे

कायदा जरी बाटला मगरूर हाती,
न्याय तोच जो मी दिला असणार आहे

एवढ्यात का हो तुम्ही केली चढ़ाई?
एकटाच भारी रणी ठरणार आहे

गझल: 

प्रतिसाद

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

शेर उत्तम!!!
बाकीची गझलही छानच. ४ थ्या शेरात काही गडबड आहे का?

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

छान शेर.