जागू नको
रात्र सारी जागू नको
झोप माझी मागू नको
जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको
शब्द माझे झोपेतले
स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको
वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
गझल:
माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता !
रात्र सारी जागू नको
झोप माझी मागू नको
जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको
शब्द माझे झोपेतले
स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको
वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
प्रतिसाद
ह बा
शनि, 12/06/2010 - 15:48
Permalink
रात्र सारी जागू नको आणि फार
रात्र सारी जागू नको आणि फार मागे
लागू नको
छान.
अनिल रत्नाकर
रवि, 13/06/2010 - 09:19
Permalink
धन्यवाद ह.बा.
धन्यवाद ह.बा.
कैलास
रवि, 13/06/2010 - 10:32
Permalink
छोट्या बहरातली छान गझल.....
छोट्या बहरातली छान गझल..... फक्त लयीत म्हणताना अडखळायला होते काही ठीकाणी....
चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको
इथे , चूक ती साधीच आहे
तोफ मोठी डागू नको
असे केल्यास लय जमते....
बाकी छान.
डॉ.कैलास
अनिल रत्नाकर
रवि, 13/06/2010 - 15:03
Permalink
क्या बात है कैलासजी, किती सहज
क्या बात है कैलासजी,
किती सहज बदल सुचवलात. धन्यवाद.
लोभ असावा.
जयन्ता५२
रवि, 13/06/2010 - 16:57
Permalink
रात्र सारी जागू नको झोप माझी
रात्र सारी जागू नको
झोप माझी मागू नको
----- छान
जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको
----- छान
शब्द माझे झोपेतले
स्वप्न माझे मागू नको
--------- समजला नाही.
चूक आहे साधीच ती
तोफ मोठी डागू नको
------------ठिक
वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
------- ??
जयन्ता५२
अनिल रत्नाकर
रवि, 13/06/2010 - 18:41
Permalink
प्रतिसादाबद्द्ल धन्यवद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवद जयन्तराव,
खुप आतुरतेने वाट पहात होतो.
अगम्य वाटलेले सुधारणे शक्य आहे.
परत एकदा आभार.
लक्ष असु द्यावे.
आपली गझलही मला फार आवडली पण माझ्यासारख्या नवख्याने गुरुंना प्रतिसाद द्यावा की नाही कळत नव्हते.