..ते मोहरू

एकटी मी पाहता जग लागले ते मोहरू
लांडग्याचे भक्ष आता जाहले ते कोकरू

डौल माझा राजहंसी लागलो मी सावरू
बदक आहे मी कळे अन लागले ते हो धरु

सांगते माझ्या मना वेड्या नको तू घाबरू
प्रेम त्याचे ढोंग होते लागले ते ओसरू

लागली होती पणाला जानकीची आबरू
संशयाचे बीज आता लागले ते पोखरू

वाद खोटे नित्य आता जाहले ते हो सुरू
काळजाला काळज्यांनी लागले ते टोकरू

नेत्र दोन्ही रोज म्हणती एकमेका आवरू
तो दिसे अन एक बोले, वाटले ते हो करू

बागडाया लागले तारुण्य प्याले पा़खरू
गात प्यारी गोड गाणी लागले ते मोहरू

गझल: 

प्रतिसाद

डौल माझा राजहंसी लागलो मी सावरू
बदक आहे मी कळे अन लागले ते हो धरु

लांडग्याचे भक्ष आता जाहले ते कोकरू

छान.

बागडाया लागले तारुण्य प्याले पा़खरू
गात प्यारी गोड गाणी लागले ते मोहरू - छान! (बागडाया लागले नंतर स्वल्पविराम गृहीत धरून पुढचा भाग वाचला)

ती चामर वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच कळाला आहे - आठवला.

धन्यवाद!

ह.बा.,बेफिकीरजी
मनःपुर्वक धन्यवाद.

एकटी मी पाहता जग लागले ते मोहरू
लांडग्याचे भक्ष आता जाहले ते कोकरू

छान..मतला आवडला..

इतर शेर सुद्धा ठीक...

का कोण जाणे.. तुमच्यातील रियल पोटेन्शियल अजून बाहेर आले नाही असे वाटते....
अजून तुमच्या रचना येउ द्यात..

धन्यवाद...

डॉ.कैलास

नेत्र दोन्ही रोज म्हणती एकमेका आवरू
तो दिसे अन एक बोले, वाटले ते हो करू

वा!

कैलासजी
बाराखडी आत्ता आत्ता थोडी थोडी कुठे कुठे जमायला लागली आहे.
अपेक्षेबद्द्ल धन्यवाद.

क्रांतिजी,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.