अधाशी....

खात आहे अधाशी किती....?
वेदने तू उपाशी किती....?

काय संकोच गेला कुठे...?
लाजली तू मघाशी किती....?

चारचौघीतही शांत तू....
बोलते पण स्वतःशी किती....!

घातले घास खाऊ मला..
ठेवलेही उपाशी किती...?

"प्रेम केले" तिला बोलता..
काय..? कोणी..? कुणाशी..? किती...?

गझल: 

प्रतिसाद

घातले घास खाऊ मला..
ठेवलेही उपाशी किती...?
छान.
"प्रेम केले" तिला बोलता..
काय..? कोणी..? कुणाशी..? किती...?
हा हा हा.. छान.