माती

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?

इथे जो तो सुखाचे पीक घेई नित्यनेमाने
कशी राहील उपजाऊ अशाने येथली माती?

तुम्ही तर बोलला होतात रुजवू बीज ऐक्याचे
तरीही काल रक्ताने कुणाच्या... माखली माती?

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

तुम्ही उपकार केले केवढे... गाडून माणुसकी
अरे तुमच्यामुळे तर ही पुन्हा गर्भारली माती

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

असे दुष्काळ पण ओली कशी शेतातली माती?
नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती

गझल: 

प्रतिसाद

व्वा !!

खूप सुंदर रचना '' मिल्या''
अतिशय वेगळा रदीफ....

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

हे दोन शेर विशेषत्वाने आवडले.

डॉ.कैलास

मिल्या,
छान. मजा आला.
विशेष आवडलेले शेर.

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

असे दुष्काळ पण ओली कशी शेतातली माती?
नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती

मस्त. व्वा.

वा...वा...जोरदार

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?
-सुंदर

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती
- छान.

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?
- सुरेख

असे दुष्काळ पण ओली कशी शेतातली माती?
नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती
- वा...वा...

येऊ द्या आणखी, मिल्या.

माणूसकी गाडण्याचा शेर आवडला.

रदीफ नावीन्यपूर्ण आहे.

आवडलेली ओळ :

नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती

गझल छानच !!!

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

वाव्वा! गझल एकंदर चांगली प्रभावी झाली आहे.

संपूर्ण गजल आवडली.प्रत्येक शेर छान तरारून आला आहे.

इथे जो तो सुखाचे पीक घेई नित्यनेमाने
कशी राहील उपजाऊ अशाने येथली माती?

व्वा !!

सुरेख गझल, आवडली.

मिल्या.
चांगली आहे रचना.

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?

इथे जो तो सुखाचे पीक घेई नित्यनेमाने
कशी राहील उपजाऊ अशाने येथली माती?

असे दुष्काळ पण ओली कशी शेतातली माती?
नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती

सुंदर !
पुलेशु.

अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

सुंदर शेर!!

भन्नाट होती यार!

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?

मतलाच इतका भन्नाट...

एक एक शेर एका वरचढ एक...

खूप खूप आवडली ही गझल.

सुंदर...

अप्रतिम
माणुसकी गाडली अन पुन्हा गर्भारली माती. अफाट कल्पना.
संपूर्ण गझल पुन्हा पुन्हा वाचून आनंद घ्यावी अशी.

उधळले चांदणे त्यांनी तरी भेगाळली माती
कुणाचे सांडले अश्रू?... कशाने तापली माती?
मतलाच इतका भन्नाट...
सुन्दर यार!!!

तुम्ही उपकार केले केवढे... गाडून माणुसकी
अरे तुमच्यामुळे तर ही पुन्हा गर्भारली माती

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

परत परत वाचावी अशी गझल.

छान.