माणसाला म्हणे मारते भाकरी!

पीक हे घेतले कोणत्या वावरी?
माणसाला म्हणे मारते भाकरी!

मायची आजही सांडते पापणी
गोजिरी केवढी दंगली सासरी

चालला कोण तो? राधिका बावरी
गोकुळी एकटी वाजते बासरी

लोकशाही तुझे लेकरू बाटके
नोकरा आज ते माग ते चाकरी

काल सत्ते घरी खेळ मी पाहिला
भाउजी भोंगळा मेहुणी लाजरी

झाड मी वाढलो कातळाच्या उरी
वेल तू मखमली खेळ खांद्यावरी

गझल: 

प्रतिसाद

नोकरा आज ते माग ते चाकरी - ही ओळ
नोकरा आज ते मागते चाकरी - अशी वाचावी.

काल सत्ते घरी खेळ मी पाहिला
भाउजी भोंगळा मेहुणी लाजरी

उत्तम शेर व सुंदर वृत्त हाताळणी !

झाड मी वाढलो कातळाच्या उरी
वेल तू मखमली खेळ खांद्यावरी

च्चा !! उत्तम शेर.

गझल आवडली.

डॉ.कैलास

झाड मी वाढलो कातळाच्या उरी
वेल तू मखमली खेळ खांद्यावरी
ही द्विपदी चांगली आहे.

बेफिकीरजी, कैलासजी, अजयजी धन्यवाद!!!