त्यांनी.....

काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...

दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी...

वाढवुन आपल्यातील गुंता...
मोकळा मार्ग केलाय त्यांनी...

हाय लागेल तुमची तुम्हाला...
लावली एवढी हाय त्यांनी...

अर्जुना प्राण सांभाळ अपुला...
सुर्य यंदा लपवलाय त्यांनी...

गझल: 

प्रतिसाद

छान.....
'' ए '' हा लघु की गुरु?

बाकी गझल मस्तच...
मतला निशेष आवडला.

डॉ.कैलास

दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी..

सुंदर शेर...

काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...

दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी... ह्या द्विपदी अतिशय आवडल्या
-मानस६

व्वा मस्त!!! पहिले दोन आवडलेच...

'हाय' सुद्धा पटला :)